Header Ads Widget

Responsive Advertisement

शेतकर्‍यांना १०० टक्के अनुदान/Land Subsidy Yojana



केंद्रात एनडीए सरकार स्थापन झालेले आहे आणि राज्यातही आता विधानसभा निवडणुकाची चाहूल सुरू झाली आहे. नवीन सरकार आले की नवनवीन योजना आखत असते. मात्र कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकर योजनेतून सरकार तुम्हाला १०० टक्के अनुदान देऊन शेती उपलब्ध करून देत आहे. लाभार्थ्याला ४ एकर शेतजमीन िकिंवा २ एकर बागेची जमीन देत आहे. त्यामुळे आजच या योजनेची पात्रता जाऊन घ्या.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ही दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबातील लोकांना आणि भूमिहीन शेतमजूरांना उत्पन्न मिळवून देण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणारी अत्यंत महत्त्वाची योजना आहे.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतून १०० टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करून देण्यावर सरकार भर देत आहे. या योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट २०१८ पासून १००% जमीन अनुदान देऊन शेतजमीन उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये लाभार्थ्याला ४ एकर शेतजमीन किंवा २ एकर बागेची जमीन दिली जाते.

या योजनांच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील २०२ शेतकर्‍यांना आतापर्यंत ५७० एकर शेतजमिनीचे वाटप करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाही जमीन वाटपासाठी खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.

Land Subsidy Yojana: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना

दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील भूमिहीन शेतमजूरांसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे वरील लोकांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळण्यासाठी जमीन अनुदान दिले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

१) या योजनेच्या लाभासाठी अर्ज करणारी व्यक्ती अनुसूचित जाती केव्हा नव-बौद्ध समाजातील असणे आवश्यक आहे.२) महत्त्वाचे म्हणजे, योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर असणे आवश्यक आहे.३) या योजनेसाठी विधवा महिलांना प्राधान्य दिले जाते.४) या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे वय १८ ते ६० वर्षे दरम्यान असावे.

Post a Comment

0 Comments